ठेवले करून पात्र केवळ सीता लक्ष्मण नि राम
जप तरी मुखातून राहे श्री राम जय राम जय जय राम
कलियुगी चालला मनुष्य उलटा भेद दंड दाम साम
आदर्श तरी म्हणे आमुचा श्री राम जय राम जय जय राम
सोयीप्रमाणे करतो मर्यादेचा आव परिधान
स्पष्टीकरण द्याया म्हणतो मग श्री राम जय राम जय जय राम
या अशा मनुष्यापेक्षा बरा नव्हे का मुका श्वान
जपच नको खोटारडा श्री राम जय राम जय जय राम
काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर मांडती मनी थैमान
मार्ग शोधण्या मुखातून यावे श्री राम जय राम जय जय राम
Originally Written on
Written by

Leave a comment