वर्तुळाची सुरुवात शोधतोसि का रे बाळा
बिंदूपासून अंतरावरी ओळ आखे वर्तुळाला
सुरुवात ओळीवरती अंतही या ओळीवरती
जन्म मृत्यू वेगळे तू दाखव या ओळीवरती
वर्तुळाची ओळख का ओळीत त्या सामावावी
बिंदुविना ओळीला त्या ध्येय नाही दिशा नाही
ओळीवर चालताना पाहशी तू अवतीभवती
भेटेन मीच तेथे वर्तुळाचा बिंदू म्हणुनि
Originally Written on
Written by

Leave a comment