अस्वस्थ मनाची धुडगूस
अपूर्ण स्वप्नांची धुडगूस
तडजोड घडवणाऱ्या आशा
अंतरमनी उमलणाऱ्या निराशा
झंझावाती आयुष्याचा वेग
पकडण्यासाठी आणि पकडल्यामुळे
असलेला विरामचा ओढा
जिद्दीला घुसमटवणाऱ्या
कंटाळ्याचा आणि शक्यतांचा
असलेला अतूट वेढा
तगमग प्रेमासाठी
तगमग प्रेमामुळे
तगमग प्रेमाशिवाय
घरातला एकाकी वास
घरातला कुणाचातरी सहवास
बेडवरची सकाळची विस्कटलेली चादर आणि पांघरूण खूप काही सांगत असतं,
ऐकायची आणि समजायची तयारी आणि क्षमता असावी लागते फक्त
Originally Written on
Written by

Leave a comment