कधीतरी एक जुनी उकल होते
आणि जाणवते कोलाहलातली शांतता
जाणवतो मनात दडलेला एक ओला कागद
जाणवतात ती आणि मी अशी तीव्र इकराची अक्षरं
जाणवतात पाऊस, प्रेम, विरह असे ओव्हर the top शब्द
आणि त्यांचा संबंध तोडणाऱ्या
मधल्या अनंत खडाखोडी
जेव्हा डायरी चा कागद आणि मनाचा कागद एकमेकांना भेटतात
तेव्हा रंगते खरी मैफल
आणि तेव्हा जाणवतं की
ती
मी
पाऊस
प्रेम
विरह
हे सगळंच केवळ वायफळ
मग ती उकल कविता होते
आणि तो गच्च ओला कागद
मी परत सुकवत ठेवतो
खडाखोडीपासून मोकळा

Leave a comment