नेहमीच्या गल्लीतून जाताना
____च्या कळपाने
माझी वाट अडवली
गुरगुरत दाखवलेले दात
रोखून ठेवलेली नजर
स्पष्ट सांगत होती की
ना हे या इथले रहिवासी
ना हे मला येताजाता दिसणारे
पाऊल पुढे टाकलं तर गुरगुरले
मागे वळलो तर स्वभाषेत बडबडले
सौम्य स्वरात काढाया गेलो समजूत
तर आणखी पुढे चालून आले
ना कळती त्यांना माझे शब्द
ना त्याच्या भाषेत बोलता येत होते
मनुष्य नि _____चे संवाद
होतात तरी कसे आणि कुठे?
जरा धिटाईने चढता माझा आवाज
त्यातला एक पुढे सरसावला
मी दचकून स्थिरावेपर्यंत
त्याने माझा पाय चावला
धक्का पचवता आला नाही
पाडलो गेलो खाली
इतर ____ही मग धावून
आले माझ्यावरी
कोणीतरी भिरकावले दगड
कोणीतरी ओरडले
आधीचे शूर वीर _______
मग पळत सुटले भित्रे!
यानंतर जरी सावरलो
तरी भीती मनात राहे
भले ओळखीचे तरी _____
प्राणीच नालायक आहे!
आरसा दाखवता समाजाला
या _____चा सरडा होतो
बहुरूपात आपल्याला दिसतो
आपण वेगळा समजून फसतो!!!
Originally Written on
Written by

Leave a comment