तव नयनी मज भासले काय कसे सांगू तुला
दाटता नभ झाले मनाचे काय कसे सांगू तुला
उगा लिहाया गेलो मनातले मनात बरे होते
टेकता लेखणी झाले कागदाचे काय कसे सांगू तुला
सुख दुःख उपास तापास भोगत भक्ताला
भेटायचे ज्याला त्याचे स्तब्ध पाय कसे संगू तुला
पुरेल का तुझी आठवण तू निघून गेल्यावरही
रदीफ शिवाय काफियाचे असणे काय कसे सांगू तुला
Originally Written on
Written by

Leave a comment